Home > News Update > उत्तर प्रदेश कोरोनाबाधित राज्य घोषित ; विधानसभा निवडणूकीबाबत संभ्रम

उत्तर प्रदेश कोरोनाबाधित राज्य घोषित ; विधानसभा निवडणूकीबाबत संभ्रम

उत्तर प्रदेश राज्यात दिवसोंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुले उत्तर प्रदेशला कोरोनाबाधित राज्य घोषित करण्यात आलं आहे. अतिरिक्त आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी २७ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटले आहे.

उत्तर प्रदेश कोरोनाबाधित राज्य घोषित ; विधानसभा निवडणूकीबाबत संभ्रम
X

उत्तर प्रदेश राज्यात दिवसोंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुले उत्तर प्रदेशला कोरोनाबाधित राज्य घोषित करण्यात आलं आहे. अतिरिक्त आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी २७ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटले आहे. त्यामुळे आता काही आठवड्यांवर येऊ घातलेली उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक होणार की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

उत्तर प्रदेश सार्वजनिक आरोग्य आणि साथ नियंत्रण कायदा २०२० च्या कलम तीन अंतर्गत संपूर्ण राज्य कोरोनाबाधित म्हणून घोषित करण्यात येत आले आहे. हा आदेश ३१ मार्च २०२२ किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे, असं या आदेशात म्हटले आहे.

ओमायक्रॉनचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २५ डिसेंबरपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहापर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असतानाच उत्तर प्रदेशमध्ये रात्रीच्या संचारबंदीचा वेळ हा रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच असा आहे.

Updated : 29 Dec 2021 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top