Home > News Update > लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अमेरिकेत रुग्णसंख्येत मोठी वाढ

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अमेरिकेत रुग्णसंख्येत मोठी वाढ

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अमेरिकेत रुग्णसंख्येत मोठी वाढ
X

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेला पूर्वपदावर आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन मागे घेतले आहे. पण आता याचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. अमेरिकेत गुरूवारी एकाच दिवसात कोरोनाचे 39 हजार नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने लोकांनी चर्च, समुद्रकिनारे आणि बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. इथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. गुरूवारी 39 हजार रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेत आतापर्यंत एका दिवसात कोरोनाचे एवढ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक नोंदवला गेला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 42 लाख 67 हजार 510 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 6 लाख 70 हजार 809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 25 हजार 45 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान संपूर्ण जगात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 4 लाख 93 हजार 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 27 Jun 2020 2:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top