Home > News Update > अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची अशरफ गनी यांच्यावर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची अशरफ गनी यांच्यावर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानींनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अशरफ गनी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची अशरफ गनी यांच्यावर टीका
X

तालिबानींनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी अमेरिकेला संबोधित केले. यावेळी सध्याच्या परिस्थितीबाबत जो बायडन यांनी अशरफ गनी (Ashraf Ghani) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अफगाणिस्तामधील स्थितीला अशरफ गनी यांना जो बायडन यांनी जबाबदार धरले आहे. गनी यांनी आपल्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभे रहायला हवे होते असं म्हणत , गणी न लढताच रणांगण सोडून पळून गेले असे जो बायडन म्हणाले.

मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, मागील 20 वर्षांत मी अतिशय कठीण निर्णय घेतले आहे. अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्यासाठी चांगली वेळ कधीच नव्हती. तरीही मोठी जोखीम उचलत आम्ही सैन्य माघारी केली. पण त्यानंतर तालिबान पुन्हा अफगाणिस्तावर कब्जा करेल, याचा अंदाज आम्हाला होता. मात्र, इतक्या वेगाने तालिबान ताबा मिळवेल असे आम्हाला वाटले नव्हते, असं जो जो बायडन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकन सैनिक माघारी बोलावल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमधून ज्या प्रकारे तिथे पुन्हा कब्जा केला. त्यावरून अमेरिका आणि जो बायडन यांच्यावर टीका होत आहे. यावर जो बायडन यांनी आपली भूमिका मांडली.

अफगानिस्तानमधील नेत्यांवर आरोप, अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीबाबत बायडन यांनी अफगाणिस्तानमधील नेत्यांवर आरोप केले. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचे नेते तेथील नागरिकांच्या फायद्यासाठी एकत्र येऊ शकले नाही. ते आपल्या देशाच्या भवितव्यासाठी तडजोड करू शकले नाहीत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघारी घेतले नसते तर ही परिस्थिती आली नसती, असे जो बायडन म्हणाले. तसेच, चीन आणि रशिया यांना वाटत होते की, अमेरिकेने अफगाणिस्तानात लाखो डॉलर्स वायफळ खर्च करावेत, असं जो बायडन म्हणाले.

Updated : 17 Aug 2021 3:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top