Home > News Update > पत्रकाराचा अपमान करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी मागितली जाहीर माफी

पत्रकाराचा अपमान करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी मागितली जाहीर माफी

ही बातमी आहे पत्रकार परिषदेला सामोरे जाणाऱ्या एका बलाढ्य देशाच्या अध्यक्षांसंदर्भातली...एवढेच नाही तर..पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना उत्तर देताना एका महिला पत्रकाराचा अपमान केल्यानंतर त्यांना माफीही मागावी लागली आहे.

पत्रकाराचा अपमान करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी मागितली जाहीर माफी
X

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकार परिषदेत त्यांना सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचा अपमान केला. पण त्यानंतर त्यांनी जाहीरपणे झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर जो बायडेन यांना एका पत्रकार परिषदेत महिला पत्रकाराने त्याबद्दल काही तिखट प्रश्न विचारले. त्य़ावर बायडेन यांचा संताप अनावर झाला आणि "तुम्हाला एवढेच कळत नसेल तर चुकीच्या क्षेत्रात काम करत आहात" असे उद्गागर काढले. पण त्यानंतर विमानतळावर पत्रकारांनी त्यांना यासंदर्भात सवाल विचारला तेव्हा मी असे बोलायला नको होते, याबद्दल मी माफी मागतो, असे म्हणत विषयावर पडदा टाकला.

नेमके झाले काय़?

जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांचीही संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. यासंदर्भातच बायडेन यांना CNNच्या पत्रकार केटलिन कोलीन्स यांनी प्रश्न विचारला. पुतीन हे आपली वागणूक बदलतील असा विश्वास आपल्याला का वाटतो, असा सवाल विचारल्यानंतर बिडेन यांनी उत्तर दिले की, " ते आपली वागणूक बदलतील याबद्दल मला विश्वास वाटण्याचा प्रश्न नाही. पण मी असे काही बोललोच नव्हतो, तुम्ही लोक काय करत असतात. संपूर्ण जगाने यासंदर्भात आपली भूमिका बदलली तर त्यांना बदलावे लागेल. माझ्या आत्मविश्वासाचा प्रश्न नाही पण मी फक्त वास्तव काय हे ते मांडले."

यावेळी कोलीन्स यांनी विचारले की, संयुक्त पत्रकार परिषदेतून पुतीन यांनी आपल्या भूतकाळातील कार्यपद्धतीत बदल केल्याचे दिसले नाही. त्यांनी सायबर हल्ला किंवा मानवा हक्क उल्लंघनाचे आरोप फेटाळले. त्यामुळे तुमच्या दोघांमधील बैठक सकारात्मक होती असे कसे म्हणायचे, असा सवाल कोलीन्स विचारला. यावर भडकलेल्या बायडेन यांनी, " जर तुम्हाला हे समजत नसेल तर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आहात" असे म्हणत ते तिथून निघून गेले. पण यानंतर जिनेव्हा विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना झालेल्या प्रकाराबद्द्ल माफी मागितली.

Updated : 19 Jun 2021 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top