Home > News Update > अमेरिकीतील कोरोनाबळींची संख्या 90 हजारांच्या पुढे

अमेरिकीतील कोरोनाबळींची संख्या 90 हजारांच्या पुढे

अमेरिकीतील कोरोनाबळींची संख्या 90 हजारांच्या पुढे
X

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 15 लाखांच्या पुढे गेली आहे. तर मृतांची संख्या 90 हजारांच्यावर पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2 लाख 83 हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमध्ये असून मृतांची संख्या 28 हजारांच्यावर गेली आहे. दरम्यान जगभरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 48 लाखांच्या जवळ येऊन ठेपली आहे. तर संपूर्ण जगातील कोरोनाबळींची संख्या 3 लाख 18 हजारांच्या पुढे गेली आहे. सुमारे 17 लाख 84 हजार रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.

अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक रुग्ण रशियामध्ये आहेत, इथंही रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या जवळपास आलेला आहे. पण रशियामध्ये कोरोना बळींची संख्या तुलनेने कमी आहे, इथे आतापर्यंत 2 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत ब्राझिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथे अडीच लाखांच्यावर रुग्ण आहेत.

Updated : 19 May 2020 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top