Home > News Update > UPSC Result युपीएससी परीक्षेत आंबेडकरवादी मिशनचे सुमित दत्ताहरी धोतरे यांच्यासह तिघांचे उत्तुंग यश

UPSC Result युपीएससी परीक्षेत आंबेडकरवादी मिशनचे सुमित दत्ताहरी धोतरे यांच्यासह तिघांचे उत्तुंग यश

UPSC Result युपीएससी परीक्षेत आंबेडकरवादी मिशनचे सुमित दत्ताहरी धोतरे यांच्यासह तिघांचे उत्तुंग यश

UPSC Result युपीएससी परीक्षेत आंबेडकरवादी मिशनचे सुमित दत्ताहरी धोतरे यांच्यासह तिघांचे उत्तुंग यश
X

आज यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत लागलेल्या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याचं दिसून आलं आहे. नांदेडमधील आंबेडकरवादी मिशन चे विद्यार्थी सुमित धोतरे यांनी 660 गूण मिळून यश संपादन केले आहे. आंबेडकरवादी मिशनच्या दिपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित यांनी अथक परिश्रम करून घवघवीत यश संपादन केले आहे. नांदेड जिल्ह्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकार दत्ताहरी धोतरे यांचे ते सुपुत्र आहेत.

तर दुसरीकडे नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक नागोराव कुंडगीर यांचे सुपुत्र रजत नागोराव कुंडगीर देशातून 602 रँकने उत्तीर्ण झाले आहेत.

रजतने केवळ तीन पदाचा पर्याय दिल्याने आता एका पोलीस निरीक्षकाच्या सुपुत्राला आयपीएस ही रँक जवळ जवळ निश्चित झाली आहे. रजत यांच्या यशामुळे नांदेड पोलीस विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नांदेड तालुक्यातील बाभूळगाव या ठिकाणी राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील शिवहार चक्रधर मोरे याने ६४९ रँक घेवून आपले स्वप्न पूर्ण केले. वडील चक्रधर मोरे हे शेतकरी असून घरी पाच एकर जमीन आहे.

दरम्यान, अंतिम परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार पास झाले आहेत. ही परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० ला घेण्यात आली होती. परीक्षेसाठी १० लाख ४० हजार, ६० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरम्यान, जानेवारी, 2021 मध्ये झालेल्या लेखी (मुख्य) परीक्षेत एकूण 10564 विद्यार्थी पास झाले होते, तर व्यक्तीमत्व विकास चाचणीसाठी (Personality Test) साठी एकूण 2053 विद्यार्थी बोलावण्यात आले होते. त्यातील एकूण 761 विद्यार्थ्यांना (545 पुरुष आणि 216 महिला) आयोगाने विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आमंत्रित केलं आहे. यामध्ये, शुभम कुमार रोल नंबर 1519294 याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

Upsc result, IAS, IPS, Sumit Dhotare, rajat Kundgir, Shivhar More, Dipak Kadam

Updated : 24 Sep 2021 6:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top