Home > News Update > UP Election :उत्तरप्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदान, योगींचा कस लागणार?

UP Election :उत्तरप्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदान, योगींचा कस लागणार?

उत्तरप्रदेशमध्ये सहाव्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान पार पडत आहे.

UP Election :उत्तरप्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदान, योगींचा कस लागणार?
X

उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुर या पाच राज्यातील निवडणूकांची रणधुमाळी संपत आली आहे. तर आज उत्तरप्रदेशात सहाव्या टप्प्यातील तर मणिपुरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यातच लक्षवेधी असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदार संघात आज मतदान होणार आहे. त्यामुळे आजच्या टप्प्यात योगींचा कस लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आज सहाव्या टप्प्यातील 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील 11 जागा आरक्षित आहेत. या टप्प्यात एकूण १० जिल्ह्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत. ज्यामध्ये, गोरखपूर, आंबेडकर नगर, बलिया, बलरामपूर, बस्ती, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज, संत कबीर नगर आणि सिद्धार्थनगर यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

निवडणुकीचा हा टप्पा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या जिल्ह्यांमधील ५७ पैकी ४६ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे या टप्प्यातील 57 जागांवर आपले वर्चस्व सिध्द करणे हे भाजपसमोरचे आव्हान असणार आहे. तर समाजवादी पक्षाने भाजपला चीतपट करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे 10 मार्च ला होणाऱ्या मतमोजणीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

कोण आहे निवडणुकीच्या रिंगणात?

या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तसेच, कृषि मंत्री सूर्य प्रताप शाही - पत्थरदेवा, शिक्षण मंत्री सतीश चंद्र त्रिवेदी - इटवा, आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह - बांसी, राज्य मंत्री श्री राम चौहान - खजनी आणि जयप्रकाश निषाद - रुद्रपुर मधुन मैदानात उतरले आहेत.


Updated : 3 March 2022 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top