Top
Home > News Update > PM मोदींच्या वाराणसी मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत भाजपचा पराभव

PM मोदींच्या वाराणसी मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत भाजपचा पराभव

PM मोदींच्या  वाराणसी मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत भाजपचा पराभव
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. प्रशासनाने अद्यापर्यंत कोणत्या पक्षाने किती उमेदवार जिंकले याची यादी जाहीर केलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत विविध पक्षांनी आपलं समर्थन करणारे उमेदवार मैदानात उतरवले होेते.

या यादीनुसार समाजवादी पक्षाने 16 जागा जिंकल्याचा दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाला 40 पैकी 8 जागा मिळाल्याचं समजतंय तर बहुजन समाज पक्षाला 5 जागांवर विजय झाला आहे. कॉग्रेसला दोन, अपना दल पक्षाला दोन, सुभासपाला दोन आणि अपक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत. या संदर्भात NDTV ने वृत्त दिलं आहे.

Updated : 5 May 2021 4:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top