Home > News Update > भाजपची पहिली यादी जाहीर , Yogi Adityanath कुठून निवडणूक लढणार?

भाजपची पहिली यादी जाहीर , Yogi Adityanath कुठून निवडणूक लढणार?

भाजपची पहिली यादी जाहीर , Yogi Adityanath कुठून निवडणूक लढणार?
X



देशात ५ राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मनिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यात विधानसभेत निवडणूक होत आहे. त्या दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

आज भाजप उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर करणार आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी, आमदारांनी तिकिट नाकारल्या जाण्याच्या भीतीने समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आज जर काही नेत्यांना तिकिट नाकारले तर हे नेते समाजवादी पक्षात जाण्यातच भीती आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या उमेदवारीचा समावेश असणार का याची उत्सुकता

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठून निवडणूक लढणार सरांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योगी मथुरा किंवा अयोध्येतून निवडणूक लढतील. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे उत्तर प्रदेशची राजकीय स्थिती

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १४ मे पूर्वी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये झाल्या. भाजप ३१२ जागा जिंकून सत्तेवर आला. सपा ४७, बसप १९ आणि कॅांग्रेसला ७ जागा मिळाल्या.

भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सीएम योगी हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

Updated : 15 Jan 2022 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top