Top
Home > News Update > मोदी आणि योगींची अखेर भेट, काय घडलं भेटीत?

मोदी आणि योगींची अखेर भेट, काय घडलं भेटीत?

मोदी आणि योगींची अखेर भेट, काय घडलं भेटीत?
X

मोदी विरुद्ध योगी असा वाद निर्माण झाल्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांनी

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक 70 मिनिटं चालली. या बैठकी संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट केलं आहे.

कोरोना दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर योगी यांना हटवण्याची देखील चर्चा उत्तर प्रदेशमध्ये सुरु होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली होती. योगी आदित्यनाथ यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेतली होती.

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. त्यादृष्टीने या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजप चे नेते योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात असून योगी आदित्यनाथ कोणाचंच ऐकत नाही. असं बोललं जात आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर योगी विरोधात मोठा मोर्चा तयार होत असल्याचं बोललं जात आहे.

Updated : 11 Jun 2021 12:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top