Home > News Update > औरंगाबाद, जालना जिल्ह्याला अवकाळीने झोडपले ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

औरंगाबाद, जालना जिल्ह्याला अवकाळीने झोडपले ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

औरंगाबाद, जालना जिल्ह्याला अवकाळीने झोडपले ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
X

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, औरंगाबाद तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर जालना जिल्ह्यातील बदनापूर,अंबड, भोकरदन या तालुक्यातील गारपीट अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने ज्वारी, गहू, हरभरा ही पिके भुईसपाट झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. गंगापुर तालुक्यातील गोदावरीच्या पट्यात जोरदार गारपीट झाल्याने कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गंगापुर तालुक्यातील कायगाव परिसरात आठवडी बाजाराच्या ठिकाणी अर्धातास जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसासोबत गारपीठ झाल्याने शेतकरी आणि दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. जोरदार गारा पडल्याने शेतामध्ये असलेल्या गहू, हरभरा या पिकाचे नुकसान झाले आहे.

Updated : 28 Dec 2021 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top