Home > News Update > वंचित नागरिकांचे लसीकरण

वंचित नागरिकांचे लसीकरण

वंचित नागरिकांचे लसीकरण
X

देशभर कोरोनाच्या omicron व्हेरीअंटचा प्रकोप वाढत असताना अजूनही मोठ्या संख्येने नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. बीड जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने असंघटित क्षेत्रातील मजुरांना गाठून लसीकरण करण्यात आला आहे.

१ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान ८० हजार नागरिकांना लसीची मात्रा देण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी १ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून आज शेवटच्या दिवसापर्यंत ८० हजार नागरिकांना लसीची मात्रा देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख यांनी दिली आहे.

ऊसतोड कामगार,वीटभट्टीवरील नागरिकांना त्यांच्या कामामुळे लसीची मात्रा घेण्यासाठी वेळ मिळत नव्हता, शासनाच्या या मोहिमेमुळे त्यांना लसीची मात्रा मिळाली असल्याचे लाभार्थी सांगत आहेत. वंचित राहिलेल्या नागिकांमध्ये वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांचा समावेश जास्त आढळून आला. या विशेष मोहिमेचा फायदा नागिकांना झाला असून या मोहिमेत या दहा दिवसांत ८० हजार नागरिकांना लसीची मात्रा देण्यात आली असल्याने या मोहिमेला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा वाघमारे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील वंचित नागरिकांना घरोघरी जाऊन लसीची मात्रा दिली आहे बीड जिल्ह्यातील वंचित लोकांना १ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत विशेष मोहिमेत लसीकरण करण्यात आले यात ८० हजार नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून दुसऱ्या डोस देण्याची तयारी आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्याचे लसीकरण उद्दीष्ट २२ लाख ९८ हजार ५३५ होते त्यापैकी १६ लाख ७० हजार ८०२नागरिकांना आजपर्यंत लसीची मात्रा देण्यात आली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख‌ यांनी सांगितले.

Updated : 11 Jan 2022 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top