Home > News Update > पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड

पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड

पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची बिनविरोध निवड
X

पुणे : पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच अजित पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे. अजीत पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील आहे, तसेच ते राज्याचे अर्थमंत्री देखील आहेत.

राज्यातील अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन चेअरमन पदी आमदार धीरज विलासराव देशमुख तर व्हॉईस चेअरमन म्हणून प्रमोद जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. तर राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख पालकमंत्री अमीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या. त्यामुळे लातूर बँकेच्या चेअरमन व्हॉईस चेअरमन बिनविरोध निवडीचा लातूर पॅटर्न कायम राहिला आहे. तर राज्यातील महत्त्वाच्या बॅंकांवर महाविकास आघाडीचे नेते अध्यक्ष निवडून आहे आहेत, त्यामुळे बँकांवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

Updated : 8 Dec 2021 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top