Home > News Update > उन्नाव बलात्कार प्रकरण, कुलदीप सेंगर दोषी

उन्नाव बलात्कार प्रकरण, कुलदीप सेंगर दोषी

उन्नाव बलात्कार प्रकरण, कुलदीप सेंगर दोषी
X

संपुर्ण देशात सध्या बलात्काराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. घटनेतील आरोपीना शिक्षा देण्यासाठी विलंब होतोय. उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदिप सेंगरला कोर्टाने दोषी ठरवले आहे. या शिक्षेवरील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे.

आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्यावर बलात्काराचा व अपहरणाचा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात हलवण्यात आला होता. ५ ऑगस्टपासून या खटल्याची रोज सुनावणी होत आहे. या प्रकरणी सेंगर आणि सहआरोपी शशी सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कोर्टाने दोषी आमदार सेंगरचे मोबाइल लोकेशनला महत्त्वाचा पुरावा मानला. पीडित युवतीला शशी सिंह दोषी आमदाराकडे घेऊन गेला होता.

उत्तर प्रदेशमधील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सेंगर यांनी २०१७ मध्ये एका युवतीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार केला होता. दिल्लीतील तीस हजारी कोर्टात आज न्यायालयाने आपला निकाल सुनावला. या प्रकरणातील आरोपपत्र उशिरा आल्याने कोर्टाने तपास करणाऱ्या सीबीआयला फटकारले. या प्रकरणातील सहआरोपी शशी सिंह यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सेंगरला कोर्टाने भादंवि ३७६, पॉक्सो कायद्यातील कलम ५ (सी) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. आज कोर्टाने एका प्रकरणावर निकाल सुनावला असून आणखी चार प्रकरणांवर निकाल येणे बाकी आहे.

२०१७ मध्ये उन्नाव मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेवेळी पीडित युवती अल्पवयीन होती. बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने सेंगरला पक्षातून निलंबित केले. ऑगस्टमध्ये सेंगर आणि सहआरोपी शशी सिंहविरोधात गुन्हेगारी कट, अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते.

Updated : 16 Dec 2019 12:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top