Home > News Update > Unlock यात्रा : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफीची मागणी

Unlock यात्रा : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफीची मागणी

अनलॉक अंतर्गत अनेक ठिकाणी व्यवसाय सुरू झाले असले तरी दोन महिन्यात झालेल्या नुकसानाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.

Unlock यात्रा : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफीची मागणी
X

लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लागू असल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद होती. आजपासून हे निर्बंध शिथिल झाल्याने सलून व्यवसाय त्यांनी आपली दुकाने उघडली आहेत. दोन महिन्यांपासून दुकान बंद होती, त्यामुळे दोन महिन्यांचे वीज बिल माफ करावं अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील कडक निर्बंध तब्बल अडीच महिन्यांनी शिथिल होत आहेत. अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व प्रकारच्या सेवा आता रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असतील. मात्र, लग्न समारंभ, अंत्ययात्रेसाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल. त्याचप्रमाणे, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील 100 लोकांच्या उपस्थितीत अवघ्या 2 तासांच्या आत उरकावे लागणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी सायंकाळी उशिरा अनलॉकचे नवे निर्देश जारी केले.

जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 1.27 टक्के तर ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता 17.65 टक्के इतकी आहे. अनलॉकसाठीचे हे दोन्ही निकष जळगाव जिल्हा पूर्ण करत असल्याने जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार व सर्व प्रकारच्या सेवा पूर्वपदावर आल्या. दरम्यान, जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी दर आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्बंधांचे स्तर ठरवले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शिस्तीने व जबाबदारीने वागावे लागणार आहे.

Updated : 7 Jun 2021 5:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top