Home > News Update > UN मध्ये साजरी होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

UN मध्ये साजरी होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती United Nations मध्ये साजरी होणार आहे. मात्र हा कार्यक्रम नेमका कसा साजरा होणार आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे अमेरिकेत कोणते कायदे करण्यात आले आहेत? याविषयी थेट अमेरिकेतून दिलीप म्हस्के यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बातचीत केली.

UN मध्ये साजरी होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
X

Dr Babasaheb Ambedkar Jayanti in America : जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती United Nations मध्ये साजरी होणार आहे. मात्र हा कार्यक्रम नेमका कसा साजरा होणार आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे अमेरिकेत कोणते कायदे करण्यात आले आहेत? याविषयी थेट अमेरिकेतून दिलीप म्हस्के यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बातचीत केली.

यामध्ये दिलीप म्हस्के म्हणाले, अमेरिकेत (America) अनेक राज्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या विचारातून जातीभेदाला थारा न देणारे कायदे करण्यात आले. तसंच 2006 पासून आम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) यांची जयंती साजरी व्हावी म्हणून प्रयत्न करीत होतो. मात्र 2017 साली तात्कालिन सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची शिफारस केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या न्युयॉर्क (New York Dr Babasaheb Ambedkar Jayanti) येथील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणेच यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रांमध्ये साजरी होणार आहे. त्याबरोबरच अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त मिरवणूक काढण्यात येणार आहे.

संयक्त राष्ट्रांमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला पंतप्रधान मोदी (PM Modi) हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

Updated : 12 April 2023 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top