Home > News Update > दापोली एसटी आगारातील एसटीचालक बांगड्या भरुन कामावर

दापोली एसटी आगारातील एसटीचालक बांगड्या भरुन कामावर

दापोली एसटी आगारातील एसटीचालक बांगड्या भरुन कामावर
X

रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून एस .टी कर्मचारी आपल्या विविध मागण्या घेऊन तीव्र आंदोलन करत आहेत, त्यातच दापोली एस.टी आगारातील चालक अशोक वनवे चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. रविवारी दुपारी 3 वाजता सुटणारी दापोली-ठाणे या शिवशाही बसचे ते चालक असून ते ड्युटीसाठी बांगड्या भरून हजर झाले. प्रवाशांना घेऊन ते ठाण्याकडे रवाना झाले.

हे चालक मुळचे बीड येथील असून कुटूंब नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहे. राज्यात एस.टी कर्मचाऱ्यांचं ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहेत. तुर्तास कोकणात एसटी सेवा सुरळीत आहे. मात्र , आता दापोली एस.टी आगरातही कर्मचारी आंदोलनाची ठिणगी पडली आहे.

Updated : 8 Nov 2021 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top