Home > News Update > पीएम केअर मधून मिळालेल्या व्हेंटिलेटरबाबतच्या रोहित पवारांच्या वक्तव्याला रावसाहेब दानवे यांचे प्रत्युत्तर

पीएम केअर मधून मिळालेल्या व्हेंटिलेटरबाबतच्या रोहित पवारांच्या वक्तव्याला रावसाहेब दानवे यांचे प्रत्युत्तर

पीएम केअर मधून मिळालेल्या व्हेंटिलेटरबाबतच्या रोहित पवारांच्या वक्तव्याला रावसाहेब दानवे यांचे प्रत्युत्तर
X

जालना : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागून शनिवारी 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतं आहे. हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेले व्हेंटिलेटर हे पीएम केअर मधून मिळाल्याचं सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल भाजपवर निशाणा साधला होता. रोहित पवार यांच्या या टीकेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिलं आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी संयमाने स्टेटमेंट करायला हवं.अशा पद्धतीने राजकारण करायची पध्दत नाही. रोहित पवार यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत असून सरकार त्यांचं आहे. आग प्रकरणाची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच अशा पद्धतीने वक्तव्य करावं असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सीएसआर फंडातून मिळणाऱ्या कोणतीही वस्तू, साहित्य हे वापरण्यास योग्य आहे की नाही याबाबत तपासणीसाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी असे म्हणत भले ही ते साहित्य कुणी का दिलेले असेना प्रधानमंत्र्यांनी दिले असो की मी दिले असो त्याची तपासणी व्हायला हवी असं रोहित पवार यांनी म्हटले होते.

Updated : 8 Nov 2021 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top