Home > News Update > केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रसंगावधान राखत विमानातील सहप्रवाशाची केली मदत

केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रसंगावधान राखत विमानातील सहप्रवाशाची केली मदत

केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रसंगावधान राखत विमानातील सहप्रवाशाची केली मदत
X

मुंबई// केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड हे दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. अचानक कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. विमानातील क्रू मेंबर्सने ऑन बोर्ड कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केली.त्यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी लगेच त्या प्रवाशाजवळ जाऊन त्याला प्रथमोपचार देऊन त्याचा जीव वाचवला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. कराड यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या मदतीची दखल घेतली आहे.

पंतप्रधान मोदींनी इंडिगोकडून करण्यात आलेलं ट्विट कोट करुन रिट्विट करत, "ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे," असं म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ट्विटला रिप्लाय देताना डॉ. कराड यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत. तसेच तुम्ही दाखवलेल्या 'सेव आणि समर्पण' या मार्गावरुनच मी जनतेची सेवा करत आहे, असंही डॉ. कराड म्हणाले.

Updated : 17 Nov 2021 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top