Home > News Update > राज्य सरकारमधील मंत्री गुळाच्या ढेपीला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे खुर्चीला चिकटून बसलेत- कराड

राज्य सरकारमधील मंत्री गुळाच्या ढेपीला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे खुर्चीला चिकटून बसलेत- कराड

राज्य सरकारमधील मंत्री गुळाच्या ढेपीला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे खुर्चीला चिकटून बसलेत अशी टीका केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केली आहे.ते हिंगोली येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान बोलत होते.

राज्य सरकारमधील मंत्री गुळाच्या ढेपीला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे खुर्चीला चिकटून बसलेत- कराड
X

हिंगोली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या हिंगोलीत आहे,यावेळी बोलताना राज्य सरकारमधील मंत्री गुळाच्या ढेपीला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे खुर्चीला चिकटून बसलेत अशी टीका भागवत कराड यांनी केली आहे.

श्री संत नामदेव महाराज यांची जन्मभूमी नरसी नामदेव या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त कराड यांनी भेट दिली तसेच यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी या राज्यसरकारचे मंत्री गुळाच्या ढेपीला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे खुर्चीला चिकटून बसले आहेत, त्यांना जनतेचे काहीही देणे घेणे नाही असं म्हंटले आहे.

सोबतच आगामी काळात जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 18 Aug 2021 10:08 AM GMT
Next Story
Share it
Top