नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

301

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात गडकरी यांनी एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.

‘काल मला अशक्तपणा वाटत असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला. यानंतर तपासणी करताना माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती चांगली आहे. मी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. तसंच ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या असतील, त्यांनी काळजी घ्यावी आणि नियम पाळावेत. सुरक्षित राहा. असं गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून त्यातच आत्तापर्यंत 22 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

Comments