Home > News Update > अनिल परब अडचणीत...वादग्रस्त रिसॉर्टबाबत केंद्र सरकारचे आदेश

अनिल परब अडचणीत...वादग्रस्त रिसॉर्टबाबत केंद्र सरकारचे आदेश

अनिल परब अडचणीत...वादग्रस्त रिसॉर्टबाबत केंद्र सरकारचे आदेश
X

मुंबई : एकीकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या अवैध बांधकामाच्या आरोप प्रकरणी आता अनिल परब यांना धक्का बसला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परिवहनमंत्री अनिल परब यांना दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याबाबत नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भाजपाकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. तर भाजपा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करत असतात. त्यातच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे परिवहमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रत्नागिरीचे पालकमंत्री असलेल्या अनिल परब यांनी दापोली मुरुड येथील समुद्रकिनाऱ्याजवळ अनधिकृतरित्या साई रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप सोमय्या यांन केला आहे. सोमय्या यांनी जून 2021 मध्ये अनिल परब यांच्या रिसॉर्टवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर सोमय्या यांनी पर्यावरण मंत्रालयाच्या सीआरझेड खात्याकडे याची तक्रारही केली होती. त्यामुळे जून 2021 मध्ये अनधिकृत असलेल्या साई रिसॉर्टची पाहणी केंद्रीय अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या तपासणीचा अहवाल त्यांनी राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. त्यानंतर परब यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पर्यावरण मंत्रालयाने बजावलेल्या नोटीससोबत हे रिसॉर्ट गेल्या 2-3 वर्षात बांधण्यात आल्याचे पुरावे आणि नकाशे अनिल परब यांना देण्यात आले होते.

दापोली मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी अतिसंवेदनशील क्षेत्रात साई रिसॉर्ट एन एक्स हे दोन मजली अनधिकृत हॉटेल बांधले. तर या रिसॉर्टमध्ये प्रवेश करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत रस्ता तयार केल्याचा आरोप आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या या नोटीशीला 15 दिवसाच्या आत उत्तर देण्यास परब यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान हे रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा अनिल परब यांनी याआधीच केला आहे. त्यामुळे परब आता या नोटीशीला काय उत्तर देतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 25 Dec 2021 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top