Home > News Update > अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांची सुरक्षा युनिसेफने करण्याची मागणी

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांची सुरक्षा युनिसेफने करण्याची मागणी

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांची सुरक्षा युनिसेफने करण्याची मागणी
X

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या बौद्ध ऐतिहासिक स्थळांना पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. तो ओळखून संयुक्त युनिसेफ या संघटनेने शांतता सैनिकांच्या मदतीने या बौद्ध स्थळांना सुरक्षितता प्रदान करावी, अशी मागणी आंबेडकरवादी मिशनच्या युनिव्हर्सल बुद्धिस्ट संघाने केली आहे.

चौथ्या आणि पाचव्या शतकात बामियान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दोन बौद्ध विशाल मूर्ती 2001 मध्ये तालिबानचा प्रमुख मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेनने डायनामाईट लावून या मूर्ती नष्ट केल्या होत्या. इसवी सन 507 मध्ये उभारण्यात आलेली 35 मीटर उंचीची व इसवी सन 554 मध्ये उभारण्यात आलेली 53 मीटर उंचीची या दोन विशाल बुद्ध मूर्ती तालिबान्यांनी डायनामाइट लावून नष्ट केल्या. मार्च 2021 मध्ये त्या ठिकाणी लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ह्या मूर्ती पर्यटकांना पुन्हा एकदा दाखवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. गांधार शैलीतील या मूर्ती व अजिंठा येथील नवव्या आणि दहाव्या गुंफेतील चित्र (मीरम शैली) मध्ये बरेच साम्य आढळते.

2015 मध्ये बामियाना या शहराची निवड दक्षिण आशियातील सांस्कृतिक राजधानी म्हणून करण्यात आली होती. बामियान व अफगाणिस्तान मधील इतर आत्यंतिक महत्त्वाच्या बौद्ध स्थळांची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. ही स्थळे केवळ बौद्ध धर्मीयांसाठी महत्त्वाची नसून संपूर्ण मानवी इतिहासासाठी महत्त्वाची आहेत आणि या बौद्ध स्थळांची जपणूक होणे आवश्यक असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. तालिबान्यांचा मागील कार्यकाल पाहता उरलीसुरली बौद्ध ऐतिहासिक स्थळे नष्ट होण्याची भीती असल्यामुळे वेळीच संयुक्त राष्ट्र संघाने युनिसेफच्या माध्यमातून आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता सैनिकांच्या सहकार्याने बौद्ध परिसराची सुरक्षा करावी, अशी मागणी दीपक कदम यांनी युनिसेफच्या प्रमुखांकडे केली आहे.

भारत सरकारने सुद्धा या बाबीकडे विशेष लक्ष देऊन बौद्धांच्या या ऐतिहासिक स्थळांची सुरक्षितता कशा प्रकारे केली जाईल, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडे तात्काळ प्रयत्न करावे अशी विनंती दीपक कदम यांनी केली आहे.

Updated : 16 Aug 2021 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top