'कसं काय महाराष्ट्र?' या निवडणूक विशेष दौऱ्यात राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आहे. दिवसभर प्रचाराच्या धामधुमीत असल्याने मध्यरात्री ०२.३० वाजता 'मॅक्स महाराष्ट्र' आणि मुनगंटीवार यांचा गप्पांचा फड रंगला.
मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर मागच्या ५ वर्षांत केलेल्या कामाचं समाधान वाटतं अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. २०२२ मध्ये देश स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरे करणार आहे. तोपर्यंत देशातल्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी पुढच्या काळात प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
https://youtu.be/sZBqhTBtDuA
भाजप सरकारच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात रोजगारांची संख्या वाढली आहे. मात्र काही लोकांना कोणतेही पुरावे आकडेवारी न देता फक्त सरकारला बदनाम करण्याची सवय लागली असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. जागतिक स्तरावर मंदी असल्याने त्याचा काही प्रमाणात परिणाम भारतावर होणं स्वाभाविक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. पाहा संपूर्ण मुलाखत...
Updated : 15 Oct 2019 10:38 AM GMT
Next Story