Home > News Update > राज्यात वर्षभरात 1 लाख 47 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या...

राज्यात वर्षभरात 1 लाख 47 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या...

राज्यात वर्षभरात 1 लाख 47 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या...
X

राज्याचा बेरोजगारी दर ८.३ टक्के असल्याचं आज विधानसभेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आलं आहे. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर केला. यामध्ये राज्यातील बेरोजगारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

२०१८-१९ महाराष्ट्रात ७३ लाख ५० हजार रोजगार उपलब्ध होते. मात्र, यामध्ये घट होऊन राज्यातील रोजगारांचा आकडा ७२ लाख ३ हजार झाला आहे. यावरुन मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील रोजगारात १ लाख ४७ हजारांची घट झाली असल्याचं समोर आलं आहे. हे प्रमाण देशातील इतर राज्याच्या तुलनेत अधिक आहे.

Updated : 5 March 2020 5:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top