- महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे च्या फोटो सह तिरंगा यात्रा
- सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का
- विनायक मेटेंच्या पत्नीने सोडलं मौन, अपघाताच्या चौकशीची मागणी
- मोठी बातमी : रस्त्या अभावी घरीच प्रसुती, जुळ्या बाळांचा मृत्यू, आईला झ़ोळीतून नेले
- मोठी बातमी : FIFA कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ(AIFF)निलंबित
- स्लॅब कोसळून ज्येष्ठ दांपत्याचा मृत्यू
- अंबानी कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
- विनायक मेटे यांचा अपघात की घातपात? चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
- कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेनं अडवलं ; पोलिसांविरोधात महिलेची तक्रार
- मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळेच उमेश कोल्हेंची हत्या
उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली.
X
अमरावतीतील झालेली औषधी व्यापाऱ्याची हत्या ही नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळे झाली, असा आरोप करण्यात आला होता . त्यानंतर NIA आणि ATSचं पथक अमरावतीत दाखल झालं आहे. दरम्यान उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतील या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
२१ जून रोजी अमरावतीतील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. ते आपलं दुकान बंद करून आपला मुलगा आणि सूनेसोबत घरी जात होते. यावेळी तीन दुचाकीस्वारांनी कोल्हेंवर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान कोल्हे यांनी नुपूर शर्माचे स्टेटस ठेवले होते, त्यामुळेच त्यांची हत्या केली, असा आरोप करत याबाबत तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
पोलीस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले, "उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालं आहे." राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल या टेलरच्या हत्येनंतर देशात हि दुसरी घटना आहे जी नुपूर शर्मा प्रकरणामुळे घडली आहे.