Home > News Update > कल्याण नगर महामार्गावर अपघात ; उल्हासनगरचे नगरसेवक अजित गुप्ता यांचं निधन

कल्याण नगर महामार्गावर अपघात ; उल्हासनगरचे नगरसेवक अजित गुप्ता यांचं निधन

कल्याण नगर महामार्गावर अपघात ; उल्हासनगरचे नगरसेवक अजित गुप्ता यांचं निधन
X

उल्हासनगर : कल्याण नगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. काल रात्री झालेल्या या अपघातात उल्हासनगर महानगरपालिकेतील तरुण नगरसेवक अजित उर्फ पप्पू प्रभुनाथ गुप्ता यांचं निधन झाले. या अपघातात त्यांच्यासोबत अन्य तीन जण गंभीर जखमी झालेत.

जखमींवर उल्हासनगर मधील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री पप्पू गुप्ता हे आपल्या मित्रांसोबत टिटवाळा येथे जात असताना, पाचवा मैल भागात हा अपघात घडला. गुप्ता यांच्या निधनाचे वृत्त शहरात पसरताच अनेकांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात गर्दी केली होती. गुप्ता हे महापालिकेतील तरुण नगरसेवक होते. या घटनेने पप्पू गुप्ता यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात या घटनेने शोक व्यक्त केला जात आहे.

Updated : 13 Nov 2021 3:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top