Home > News Update > शरद पवार यांच्या तोंडात अल्सर: नवाब मलिक

शरद पवार यांच्या तोंडात अल्सर: नवाब मलिक

शरद पवार यांच्या तोंडात अल्सर: नवाब मलिक
X

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला. त्यानंतर डॉक्टरांनी हा अल्सर काढला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान शरद पवार यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

Updated : 25 April 2021 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top