Home > News Update > #RussiaUkrainewar : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे भावनिक आवाहन

#RussiaUkrainewar : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे भावनिक आवाहन

रशिया युक्रेन युध्द 19 व्या दिवशीही सुरूच आहे. तर या युध्दात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेंस्की यांनी जगभरातील देशांना भावनिक आवाहन केले आहे.

#RussiaUkrainewar : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे भावनिक आवाहन
X

रशिया युक्रेन युध्द सलग 19 व्या दिवशीही सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. तर युक्रेनही चिवट झुंज देत आहे. दुसरीकडे रशियाने युध्द थांबवण्यासाठी जगभरातील देशांकडून रशियावर दबाव आणला जात आहे. मात्र जागतिक दबावाला न जुमानता रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत. त्यामध्ये युक्रेनच्या अनेक नागरीकांचा मृत्यू होत आहे. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेंस्की यांनी एक ट्वीट करून जगभरातील देशांना आणि कंपन्यांना भावनिक आवाहन केले आहे.

वोल्डोमीर झेलेंस्की यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, युक्रेनच्या मुलांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या रशियासोबतचा व्यापार सर्व देशांनी थांबवला पाहिजे. तसेच युध्द थांबवण्यासाठी राजकारण्यांनी संपर्क करायला हवा, पत्रकारांनी बोलायला हवं, जगभरातील व्यापाऱ्यांना रशिया सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणायला हवा. कारण रशियात उद्योग करून मिळणारे डॉलर आणि युरो युक्रेनमधील रक्तपातासाठी दिले जाणार नाही.

त्याबरोबरच झेलेंस्की यांनी पुढे म्हटले आहे की, रशिया विरुध्दच्या या युध्दाची किंमत अत्यंत भयावह असणार आहे. त्यामे सर्व देशातील नागरीकांनी युक्रेनियन लोकांसाठी, आपल्या मित्रांसाठी आणि भागिदारांसाठी सहकार्य करायला हवे. त्यासाठी जगातील प्रत्येकाने नैतिक भुमिका घ्यायला हवी. ययाबरोबरच फक्त जगभरातील देशांनीच नाही तर कंपन्यांनीही भुमिका घ्यायला हवी, असे मत झेलेंस्की यांनी व्यक्त केले.

यावेळी झेलेंस्की यांनी सांगितले की, रशिया युक्रेनवर जोरदार हल्ले करत असून रशियाचा प्रतिकार करण्यासाठी युरोपियन देशांनी आम्हाला आणखी शस्रे द्यावीत. ज्यामुळे आम्ही आमच्या नागरीकांचे संरक्षण करू शकू, असे झेलेंस्की यांनी सांगितले. त्यामुळे युक्रेनने शस्रांची मागणी केल्याने रशिया युक्रेन युध्द आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Updated : 16 March 2022 3:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top