Home > News Update > रशियाच्या हल्ल्यात दोन हजार नागरीकांचा बळी, युक्रेनचा दावा

रशियाच्या हल्ल्यात दोन हजार नागरीकांचा बळी, युक्रेनचा दावा

रशिया युक्रेन युध्द सातव्या दिवशीही सुरूच आहे. या युध्दात मोठ्या प्रमाणावर विध्वंस सुरू आहे. तर रशियाने युक्रेनमधील शहरांवर केलेल्या हल्ल्यात दोन हजार नागरीकांचा बळी गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

रशियाच्या हल्ल्यात दोन हजार नागरीकांचा बळी, युक्रेनचा दावा
X

रशिया युक्रेन युध्दाच्या सात दिवसात मोठा विध्वंस घडला असून रशियाने केलेल्या हल्ल्यात दोन हजार युक्रेनच्या नागरीकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. याबाबत रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

गेल्या सात दिवसांपासून रशिया युक्रेन युध्द पेटले आहे. या युध्दात मोठा विध्वंस सुरू आहे. तर शक्तीशाली रशियाला अजूनही युक्रेनची राजधानी कीव्ह आणि खारकीव्ह शहरे ताब्यात घेण्यात यश आले नाही. त्यातच रशियाने क्लस्टर बाँब आणि व्हॅक्युम बाँबचा वापर करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात सैनिकांसह सामान्य नागरीकांचाही बळी जात आहे. त्यातच रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन हजार नागरीकांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या आपत्कालिन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रशियाच्या हल्ल्यांना युक्रेनकडूनही चिवट झुंज दिली जात आहे. तर दुसरीकडे युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळातील चर्चा अपयश ठरल्याने रशियाने हल्ले तीव्र केले आहेत. मात्र युक्रेनधील चार लाख 20 हजार नागरीकांनी देश सोडला आहे. हजारो नागरीकांनी बेसमेंट, बंकर आणि इतर सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे, याबाबतचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

रशियाने युक्रेनविरोधात युध्द पुकारल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरून रशियाविरोधात मोहिम उघडण्यात आली आहे. तर अमेरीकेच्या संयुक्त राष्ट्रातील रशियाच्या मिशनमधून 12 अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाचा यजमान देश असलेल्या अमेरीकेकडून हे वचनबध्दतेचे उल्लंघन केल्याची टीका रशियाने केली आहे. त्यामुळे सध्या अमेरीकेने केलेल्या कृतीमुळे रशिया भडकला आहे. त्यामुळे रशियाची कोंडी करण्यासाठी जगभरातील देशांनी केलेल्या कृतीमुळे रशिया नेमकी काय भुमिका घेणार याकडे लक्ष वेधले आहे.


Updated : 2 March 2022 3:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top