Home > News Update > 22 जानेवारीला उद्धव ठाकरे काळामंदिरात दर्शन घेणार : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना दिले निमंत्रण

22 जानेवारीला उद्धव ठाकरे काळामंदिरात दर्शन घेणार : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना दिले निमंत्रण

22 जानेवारीला उद्धव ठाकरे काळामंदिरात दर्शन घेणार : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना दिले निमंत्रण
X

अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास ठाकरे शैलीत या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला. या देशाला राष्ट्रपती आहेत, असा चिमटा काढत, त्यांनी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची आग्रही मागणी केली.

शिवसेनाप्रमुखांनी भगवान श्री राम मंदिरासाठी अथक संघर्ष केला..

उद्धव ठाकरे यांनी लिहिल्या पत्रात काही ठळकबाबी मांडल्या आहेत. उद्धव ठाकरे पत्राच्या सुरुवातीला लिहितात "सर्वप्रथम, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पार पडणाऱ्या प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या धार्मिक संकल्पाच्या पूर्ततेचा हा कळस आहे. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर भगवान श्री राम मंदिरासाठी अथक संघर्ष केला. भगवान श्रीरामाचे आदर्श केवळ हिंदू धर्म किंवा हिंदुत्वापुरते मर्यादित नाहीत तर ते राष्ट्राच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. असे उद्धव ठाकरे यांनी पत्रात अधोरेखित केलं आहे.

हा देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितेचा क्षण

22 तारखेला दिवाळी झालीच पाहिजे. पण जे दिवाळं निघालय त्याच काय ? असा टोला त्यांनी भाजपला लगावला. देशाचं जे दिवाळं निघालं आहे त्यावरून चर्चा करा. ती चर्चा चाय पे चर्चा करा, बिस्कीट पे चर्चा करा, जलेबी फाफडावर चर्चा करा, फरसाणवर चर्चा करा, पण चर्चा करा ? असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षांनू वर्ष लढा चालला होता, ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला. म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठीचीही तो क्षण आहे. त्याला राष्ट्रपतीला सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या तेजस्वी उपस्थितीच्या हार्दिक अपेक्षेने

पत्राच्या समारोपात स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची आठवण करून देतांना ठाकरे असं लिहितात की महोदया, यापूर्वीही सोमनाथ मंदिराचा अभिषेक तत्कालीन राष्ट्रपती माननीय राजेंद्र प्रसाद जी यांनी केला होता. म्हणजेच तुमची नाशिकमधील उपस्थिती अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेची प्रतिष्ठाही वाढवेल आणि राजेंद्रप्रसादजींनी प्रस्थापित केलेली परंपराही कायम राखेल.

त्यामुळे देशाचे प्रथम नागरिक या नात्याने आपण नाशिकला भेट देऊन आमच्यावर कृपा करावी अशी विनंती ठाकरेंनी केली आहे. कर्मयोगी श्री राम यांच्या कार्यस्थळी नाशिकमध्ये येऊन या कर्मप्रधान राष्ट्रात तुम्ही आदिवासी आणि सनातनी हिंदूंना अभिमान वाटण्याची संधी तर द्याल अशी आशा आणि विश्वास आपल्या पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Updated : 13 Jan 2024 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top