Home > News Update > सरकार टिकणार का? उध्दव ठाकरेंनी संभ्रम वाढवला

सरकार टिकणार का? उध्दव ठाकरेंनी संभ्रम वाढवला

सरकार टिकणार का? उध्दव ठाकरेंनी संभ्रम वाढवला
X

आज शिवसेनापक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर टीका करतानाच स्वाभीमानाशी तडजोड करत दुसऱ्यांच्या पालख्या उचलणार नाही, भले ही फाटक्या चपला पायात असल्या तरी चालतील असं म्हणत शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावरही टीका केली आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांनी आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकेल का? याबाबत शिवसैनिकांशी बोलताना एकही ठोस वाक्य उध्दव ठाकरे बोलले नाहीत. सरकारचं काय होईल? हे पुढचं पुढे बघू, शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही. असं म्हणत उध्दव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. यामुळे सरकारच्या भवितव्याबाबत अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.

काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी?

उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उत्तर देताना अनेक राजकीय पक्ष करोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ स्वबळाचा नारा. स्वबळ तर हवंय. ताकद तर कमवावीच लागते. पण ती कशी? असं म्हणत यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत माझे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे की स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास असायला हवा. जर आत्मविश्वास नसेल तर तू काहीही करू शकणार नाही आणि आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुला कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेनं दिलं.

असं स्वबळाचा नारा देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच नागरिक अस्वस्थ असताना स्वबळाचा नारा नारा देणाऱ्या कॉंग्रेसला पुन्हा एकदा त्यांनी 'आम्ही स्वबळावर आणू असं म्हटलं, तर लोक जोड्यानं हाणतील. असा इशारा दिला आहे.

एकंदरित उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर निशाणा साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी काळात शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकत्रीत निवडणूका लढण्याची दिलेली ऑफर उद्धव ठाकरेंनी फेटाळलेली दिसते.

Updated : 19 Jun 2021 3:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top