गड किल्ले भाड्यानं दिल्यास अर्थव्यवस्थेला हातभार : उदयनराजे भोसले
X
गड-किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेल मध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला राज्यभरातील शिवप्रेमींनी मोठा विरोध केला आहे.
मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज व भाजपमध्ये राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्य़ा उदयनराज भोसले यांनी सरकारच्या या धोरणाला पाठींबा दिला आहे.
उदयनराजे भोसले यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करून देण्याच्या धोरणावर माध्यमांनी चुकीचा निष्कर्ष दिला. मी पर्यटन मंत्र्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सरकारचे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले आहे. हा निर्णय तिळमात्र चुकीचा नाही, आपण देवळात लग्न लावतोच ना?’ असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. ‘त्याचप्रमाणे या निर्णयामुळे हेरिटीज टुरिझमला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागेल यात काही चुकीचं नाही. शिवाजी महाराजांचे गड, किल्ले सोडून इतर किल्यांच्या विकासाचे राज्याचे धोरण आहे.’
दरम्यान उदयनराजे यांच्या या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.