News Update
Home > News Update > 'त्या' गरीब मुलाबाबत उदयनराजेंचं मोठ भाकीत

'त्या' गरीब मुलाबाबत उदयनराजेंचं मोठ भाकीत

त्या गरीब मुलाबाबत उदयनराजेंचं मोठ भाकीत
X

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज लॉकडाऊनच्या विरोधात आगळं वेगळं आंदोलन केलं. यावेळी उदयनराजे यांनी हातात कटोरा घेत भीक मांगो आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

या आंदोलनादरम्यान खासदार उदयनराजे यांनी एका गरीब मुलाबाबत मोठं भाकीत केलं आहे. खासदार उदयनराजे यांनी हे आंदोलन सुरु असताना पत्रकारांशी बातचीत केली.

'त्या' गरीब मुलाबाबत उदयनराजेंचं मोठ भाकीत


Udayanraje bhosale predicted about poor boy say
उदयनराजे पत्रकारांशी बोलत असताना एक गरीब मुलगा त्यांच्या पाठीमागे येऊन बसला होता. पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून हटवलं. हा मुलगा उदयनराजे यांच्या पाठीमागे असल्याने त्यांना पोलिसांची ही कृती दिसली नाही. मात्र, पत्रकारांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजे यांना या गरीब मुलाबाबत विचारले, तेव्हा उदयनराजे यांनी 'मला माहिती नाही, पोलिसांची लायकी पण नाही. गरीब श्रीमंत हा विषयच नाही. Fortune 500 हे मॅग्झीन पाहिले. तर जगातले सगळ्यात श्रीमंत जे लोक आहेत. ते फुटपाथवर जन्माला आले आहेत. फुटपाथवर काम करत त्यांनी सातत्य राखलं आणि त्यामुळं ते मोठे झाले. कष्ठाने… होईल मोठा तो… ज्या दिवशी तो मोठा होईल. त्या दिवशी त्याच्या तैनातीत असे (पोलिस) असतील. त्या माणसाला कळायला पाहिजे. ज्याने हटकले ते. असं म्हणत हा मुलगा भविष्यात मोठा होईल असं भाकीत उदयनराजे यांनी केलं आहे.

दरम्यान उदयनराजे यांनी यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले…


'ज्याचं हातावर पोट आहे त्यांची लॉकडाउनमुळं काय अवस्था झाली असेल. करोनावरील लसीकरण मिळत नाही आणि ज्यांना करोना लस दिलीये ते पॉझिटिव्ह मिळत आहेत. हा काय बाजार मांडलाय का? लॉकडाउन हटवून टाका. मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो. हे सगळं धुळफेक आहे. वाझे प्रकरण लपवण्यासाठी आहे,' सणासुदीचे दिवस आलेत. कामगार लोक आहेत, व्यापारांनी कर्ज काढलं आहे. बँकानी त्यांच्यासमोर पैशासाठी तगादा लावलाय आणि लॉकडाउनमुळं तुम्ही त्यांना भीकेला लावणार का? '' असा सवाल करत उदयनराजे यांनी सरकारवर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली…

गरीब जनता, नोकरदार व शेतकरी वर्गाची आज आर्थिकदृष्ट्या अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. लॉकडाऊनची अशीच परिस्थिती पुढे राहिली तर जनतेच्या हातात नक्कीच कटोरा आल्याशिवाय राहणार नाही. हे राज्यसरकार ने लक्षात घ्यावे. आज सर्व मंत्री आमदार व अधिकारी घरामध्ये निवांत बसले असतील पण अशीच परिस्थिती राहिली तर लोक तुम्हाला घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. वेळीच सरकार ने गांभिर्याने विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा यासाठी मोठा लोकलढा उभारण्याची माझी तयारी आहे व मी यातून मागे हटणार नाही.

आज लोकांना कोरोना लस मिळत नाही तसेच रुग्णांना बेड मिळत नाहीत, रेमडीसीवर औषधाचा काय काळा बाजार चालू आहे हे जनतेला समजायला हवं. जनतेचा उद्रेक होऊन होणाऱ्या नुकसानीस राज्य सरकार जबाबदार असेल.

असा इशारा उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे.

Updated : 10 April 2021 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top