Home > News Update > महाभारतात 'राम' लोकसत्तेवर टीका

महाभारतात 'राम' लोकसत्तेवर टीका

महाभारतात राम लोकसत्तेवर टीका
X

सध्याच्या डिजिटल युगात बातम्या देण्याचा वेग वाढला आहे. स्पर्धेत टीकायचे असेल तर बातमी सगळ्यात आधी देण्याचा प्रयत्न प्रत्येक माध्यमसंस्था करत असते. अशी घाई करताना काही चुकाही घडत असतात. पण आता स्मार्ट फोनच्या जगात अशा चुका पटकन व्हायरल होतात. लोकसत्ताच्या एका डिजिटल बातमीमधील अशीच एक चूक सध्या व्हायरल झाली आहे.

रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यासंदर्भातली बातमी देताना शीर्षकात रामायणाऐवजी 'महाभारतात भगवान राम साकारणारे अरुण गोविल यांचा भाजप प्रवेश' असे लिहिले होते. कौशल इनामदार यांनी लगेचच या बातमीचा स्क्रीनशॉट काढून ट्विट केला. "महर्षी लोकसत्ताचं हार्दिक अभिनंदन!" असा टोला लगावत त्यांनी ही चूक निदर्शनास आणून दिली. या ट्विटनंतर काही मिनिटात लोकसत्ताच्या वेबसाईटवर सदर बातमी अपडेट करण्यात आली.

Updated : 19 March 2021 9:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top