Jio BlackRock म्युच्युअल फंडाच्या दोन योजना लवकरच गुंतवणुकीसाठी खुल्या होणार
सेबीकडे दोन योजनांसाठी कागदपत्रे सादर,गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यास सेबीने दिली मान्यता
X
भारतातील वेगाने बदलणाऱ्या म्युच्युअल फंड बाजारात Jio BlackRock Asset Management मुळे मोठी स्पर्धा वाढणार आहे.. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या Jio Financial Services आणि जागतिक गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज कंपनी BlackRock यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाने दोन योजनांसाठी सेबीकडे ऑफर डॉक्युमेंट्स सादर केले आहेत. या योजना डेट आणि फिक्स्ड इनकम श्रेणीतील आहेत. Jio BlackRock Liquid Fund आणि Jio BlackRock Money Market Fund या दोन योजना आहेत. यासोबतच , Jio BlackRock ला सेबीकडून Jio BlackRock Investment Advisors या नावाने इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर म्हणून काम करण्यासाठीही सेबीने मंजुरी दिली आहे,अशी माहिती जिओ फायनाशियल सर्विसेसने दिली आहे.
लिक्विड फंड हा एक म्युच्युअल फंडातील योजना आहे. या योजनेत अल्पकालिन कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंडातून लवकर पैसे काढता येतात. तसेच या फंडात फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा मिळतो. तसेच गुंतवणूकदारांना एक किंवा दोन दिवसात त्याची गुंतवणूक परत मिळते. लिक्विड फंड हहे अल्पकालिन गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहेत.
. दुसरीकडे, मनी मार्केट फंड हे एक वर्षापर्यंत परिपक्वता असलेल्या कर्ज साधनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनेतून स्थिर असावा परतावा मिळतो.
Jio BlackRock ची वेबसाइट आता ‘अर्ली अॅक्सेस’सह लाईव्ह झाली आहे. या वेबसाईटवर इच्छुक गुंतवणूकदार नोंदणी करू शकतात.
या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया इतर म्युच्युअल फंडांप्रमाणेच सोपी आणि डिजिटल-फर्स्ट आहे.