Home > News Update > ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना रांचीतून अटक

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना रांचीतून अटक

वीजबिल देयके भरण्यासाठी बनावट ऑनलाईन लिंक पाठवून फसवणूक करणाऱ्या दोघा जणांना मुंबई पोलिसांनी रांची येथून अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. यासाठी सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचे आदेश मुंबई (Mumbai) पोलिसांनी दिले आहेत.

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना रांचीतून अटक
X

सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्यासाठी चोरांकडून नवनविन युक्त्या वापरल्या जात आहेत. आणि नागरिकांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केली जात आहे. अशाच एका ऑनलाईन ( online ) फसवणूकीचा छडा मुंबई पोलिसांनी लावला आहे. वीज बील भरण्यासाठी बनावट ऑनलाईन लिंक नागरिकांना पाठवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईतील शिवडी पोलिसांनी झारखंडच्या (Jharkhand) रांची (Ranchi) येथून अटक केली आहे. वीरेंद्र अशोक लोहरा आणि उमेश परमेश्वर साव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी ग्राहकांना तुमचे विज बील ताबडतोब भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे धमकी देवून फसवणूक करत होते. तुमचे वीज बील थकले आहे. त्यामुळे तुमची वीज जोडणी तोडण्यात येईल आणि ही कारवाई थांबवायची असेल तर त्वरीत बील भरण्याची धमकी हे आरोपी ग्राहकांना देत होते. त्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर वीज बील ताबडतोब भरण्यासाठीचे एसएमएसद्वारे एक बनावट लिंक आरोपींकडून पाठवली जात असे आणि ग्राहक या जाळ्यात अलगद अडकून पैसे भरायचे आणि नंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे, मात्र तोपर्यत वेळ निघून गेलेली असायची आणि भरलेले पैसे परत मिळण्याची कोणतीही गॅरंटी नव्हती. अशा प्रकारची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती शिवडी पोलीसांना (Sewri Police Station) प्राप्त झाल्यानंतर त्यांनी यांची खोलात जावून तपास केला असता याच्या तारा झारखंडमध्ये पोहचल्या असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले आणि पोलीसांनी झारखंडच्या रांची येथे जावून दोघांना या प्रकरणी ताब्यात घेतले. या दोघांनी लोकांकडून आत्तापर्यत किती पैसे उकळले आहेत. याचा तपास शिवडी पोलीस (Sewri Police Station) करत आहे. तसेच अशा बनावट एसएमएसला प्रतिसाद न देता कोणताही आर्थिक व्यवहार करुन नये असे आवाहन शिवडी पोलीसांनी नागरिकांना केले आहे. तसेच अशाप्रकारच्या लिंक आल्यातर त्या लिंकवर क्लिक सुद्धा करुन नये, असे पोलीसांनी सांगितले आहे.

Updated : 4 March 2023 7:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top