Home > Max Political > ठाकरे सरकारमधील आणखी 'दोन मंत्री' अडचणीत; सीआयडीने दिल्या नोटीसा

ठाकरे सरकारमधील आणखी 'दोन मंत्री' अडचणीत; सीआयडीने दिल्या नोटीसा

ठाकरे सरकारमधील आणखी दोन मंत्री अडचणीत; सीआयडीने दिल्या नोटीसा
X

मुंबई: महाविकास आघाडी सरकार आधीच अडचणीत असताना, आता दोन मंत्र्यांना कर्जमाफी घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने नोटीसा पाठवल्या असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील साडेआठ कोटी रुपयांच्या कर्जमाफी प्रकरणात तत्कालीन संचालकांना सीआयडीने नोटीस बजावल्या आहेत. यात ठाकरे सरकारमधील रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश आहे.

बँकेने ५२ सहकारी संस्थांची साडेआठ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित केली होती, ज्याची एकूण रक्कम व्याजासह ३८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पुढे या संस्था बंद पडल्या असून, नोटिसा बजावण्यासाठी त्यांचे पत्ते सापडत नसल्याचे कारण सांगून ही कर्जे निर्लेखित करण्यात आली होती.

त्यामुळे अॅड. सदाशिव गायके यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार क्रांतीचौक पोलीस ठाण्यात १० जून २०१६ रोजी तत्कालीन संचालक मंडळ व बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुढे २०१९ मध्ये या कर्जमाफीचा घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे देण्यात आले.




आजपासून नोंदवणार जवाब...

भुमरे आणि सत्तार यांच्यासह गुन्हे दाखल झालेल्या 28 जणांना नोटीस देण्यात आल्या आहे. या सर्व पदाधिकारी, संचालक आणि अधिकाऱ्यांना जवाबासाठी आजपासून हजर राहण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज जवाबासाठी कोण-कोण हजर राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 2 July 2021 5:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top