Home > News Update > कल्याण परीसरात आढळले एकाच वेळी दोन मृतदेह; एक इमारतीत तर दुसरा रेल्वे रुळावर

कल्याण परीसरात आढळले एकाच वेळी दोन मृतदेह; एक इमारतीत तर दुसरा रेल्वे रुळावर

कल्याण सिंडीकेट परीसरातील पडझड झालेल्या एका इमारतीमधून अचानक दुर्गंध येत असल्याने तेथील नागरीकांनी पाहणी करत शोध घेतला असता तिथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. नागरीकांनी सदर घटनेची माहिती तात्काळ महात्मा फुले पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मुलीच्या कुटूंबीयांचा शोध घेतल्यानंतर असे समजले की, ही मुलगी 13 जानेवारी पासून घरातून बेपत्ता होती.

कल्याण परीसरात आढळले एकाच वेळी दोन मृतदेह; एक इमारतीत तर दुसरा रेल्वे रुळावर
X


कल्याण: कल्याणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरात एकाच वेळी दोन मृतदेह आढळली आहेत यात एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचाही मृतदेह असून ती 13 जानेवारीपासून घरातून बेपत्ता होती. तिचा मृतदेह एका पडझड झालेल्या अवस्थेत सापडला. त्याच वेळी कल्याण रेल्वेस्थानकाजवळील रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. असे दोन मृतदेह एकाच वेळी सापडल्यामूळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी ही घटना प्रेमप्रकरणातून घडली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पुढे सुरू आहे.

दुर्गंध येताच इमारतीची पाहणी केली तर....

कल्याण सिंडीकेट परीसरातील पडझड झालेल्या एका इमारतीमधून अचानक दुर्गंध येत असल्याने तेथील नागरीकांनी पाहणी करत शोध घेतला असता तिथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. नागरीकांनी सदर घटनेची माहिती तात्काळ महात्मा फुले पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मुलीच्या कुटूंबीयांचा शोध घेतल्यानंतर असे समजले की, ही मुलगी 13 जानेवारी पासून घरातून बेपत्ता होती.

तपासादरम्यान मुलीच्या मृतदेहाजवळ दोन मोबाईल आढळून आले असून त्यामध्ये एक मोबाईल अल्पवयीन मुलीचा तर दुसरा मोबाईल रेल्वे मार्गावर उडी मारुन आत्महत्या केलेल्या तरुणाचा असल्याचे आढळले. संबधित तरुण हा जालना भागातील रहिवाशी असल्याचे समोर आले. प्रेमप्रकरणातून त्याने मुलीची हत्या करुन दुसऱ्या दिवशी स्वत:ला संपवलं असावं असा संशय पोलीसांना आहे यासंदर्भात अधिक तपास चालू आहे.

Updated : 23 Jan 2024 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top