Home > News Update > चीड आणणारा प्रकार : दोन दलितांना मारहाण करत चाटायला लावली स्वत:चीच थुंकी

चीड आणणारा प्रकार : दोन दलितांना मारहाण करत चाटायला लावली स्वत:चीच थुंकी

चीड आणणारा प्रकार : दोन दलितांना मारहाण करत चाटायला लावली स्वत:चीच थुंकी
X

औरंगाबाद // बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात घडलेला एक चीड आणणारा प्रकार समोर आला आहे. निवडणुकीमध्ये आपल्याला मत दिले नाही या रागातून 2 दलित मतदारांवर अमानवी अत्याचार करण्यात आलेत. याबाबतचा व्हिडीओ गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी ट्विट Tweet केला आहे.

त्या व्हिडीओ Video मध्ये एक व्यक्ती दोन दलितांना उठा-बशा काढायला लावताना दिसत आहे. उठा-बशा काढून ते दोघे थकल्यावर त्यांना चक्क जमीनीवरती थुंकायला लावून नंतर तीच थुंकी त्यांना चाटायला लावण्याचा चीड आणणारा प्रकार समोर आला आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने पराभवानंतर हा किळसवाना प्रकार केल्याचा आरोप मेवानी यांनी केला आहे.

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत मेवानी यांनी संताप व्यक्त केलाय. या दलितांना मारहाण केली, उठाबशा काढायला लावून थुंकी चाटायला लावली या असल्या श्रेष्ठत्वाच्या विकृत भावना आपण कधी बाजूला ठेवणार आहोत? असा प्रश्न मेवानी यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 19 Dec 2021 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top