News Update
Home > News Update > Twitter बॅन केलं तर 'हे' लोक मोदींना हिटलर म्हणतील: संबित पात्रा

Twitter बॅन केलं तर 'हे' लोक मोदींना हिटलर म्हणतील: संबित पात्रा

Twitter बॅन केलं तर हे लोक मोदींना हिटलर म्हणतील: संबित पात्रा
X

ट्वीटर आणि केंद्र सरकार यांच्यात ब्लू टीक वरून (Verified Account) निर्माण झालेला वाद थांबता थांबत नाही. त्यातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक हटवल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर ट्वीटरने ब्लू टीक पुन्हा पुर्ववत केलं आहे. या दरम्यान अनेकांनी ट्विटर विरोधात राग व्यक्त केला आहे. कोणी सरकारवर टीका केली आहे तर कोणी ट्विटरवर टीका केली आहे.

दरम्यान रिपब्लिक टीव्हीच्या "पुछता है भारत" या डिबेट शो मध्ये भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला.

"आज काही काँग्रेसचे लोक ट्विटर बॅन करण्याची मागणी करत आहेत, तेच लोक नंतर ट्विटर बॅन झालं म्हणून पंतप्रधानांवर टीका करतील. असं म्हणत त्यांनी काँग्रेसलवर टीका केली.

काँग्रेसचे काही प्रवक्ते ट्विटर बॅन करून टाका असं सांगत आहेत. बॅन केल्यानंतर हेच प्रवक्ते मेणबत्त्या जाळतील. हे दोन्ही बाजूने मेणबत्त्या जाळणारे आहेत. ते असं ही बोलतील की, बघा मोदींनी ट्विटर बॅन केलं, मोदी तर हिटलर आहेत.

चर्चेत सहभागी असलेल्या राजकीय विश्लेषक मनस्वी थापर वारंवार 'ट्विटरला सरळ सरळ बॅन का नाही करून टाकत, सारख्या नोटीसा का देता?' असा सवाल केंद्र सरकारला करत होती.

त्या पुढे म्हणाल्या, "आम्हाला ट्विटरसोबत डेमोक्रसी - डेमोक्रसी नाही खेळायचं. इथे आमच्या उपराष्ट्रपतींचा प्रश्न आहे, त्यांची हिम्मत कशी झाली? ट्विटरची हिम्मत कशी झाली आणि आम्ही इथे डेमोक्रसी - डेमोक्रसी खेळणार. संबित पात्रा जी एक विदेशी कंपनी आपल्या देशात येऊन असं कसं करू शकते?

संबित पात्रांनी उत्तर दिले, मला हे मान्य आहे की त्यांची एवढी हिम्मत नाही व्हायला पाहिजे. तुम्ही ट्विटर बॅन करण्याची मागणी करताय तुमच्या विचारांचं मी स्वागत करतो. डेमोक्रसी - डेमोक्रसी हा काही खेळ नाही, त्याची एक प्रक्रिया असते आणि सरकार ती पाहत आहे तुम्ही निश्चितं रहा. जर ट्विटर पुढे ही मनमानी पद्धतीने वागत राहील, तसेच संविधानाद्वारे नाही वागलं तर तो दिवस लांब नाही. ज्यावेळी सरकार कडक पाऊल उचलेल.

देशातील भाजपच्या नेत्यांचे ब्लू टीक हटवल्यानंतर केंद्राने ट्विटरविरोधात कडक पावलं उचलत एक नोटीस धाडली आहे. ज्यामध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसला नवीन आयटी नियमावलीचा वापर करण्यासाठी शेवटची संधी देण्यात असल्याचं म्हटलं आहे.

त्यानंतर ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत तसेच संघटनेतील काही लोकांच्या ब्लू टीक पूर्ववत केल्या आहेत.

Updated : 6 Jun 2021 1:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top