Home > News Update > शरद पवार यांना Twitterवर Unfollow का केले जात आहे?

शरद पवार यांना Twitterवर Unfollow का केले जात आहे?

शरद पवार यांना Twitterवर Unfollow का केले जात आहे?
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरील काही वापरकर्त्यांनी अनफॉलो केले आहे. देशातील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवार यांना अचानक अनफॉलो करणाऱ्यांची संख्या का वाढली आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे वादग्रस्त पुस्तक...नाशिकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. यानंतर समारोपाच्या भाषणात शरद पवार यांनी या शाईफेकीचा निषेध केला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगत गिरीश कुबेर यांचे पुस्तक आपण वाचल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या याच भूमिकेमुळे अनेकजण नाराज झाले आहेत. त्यामुळेच आता शरद पवार, सुप्रीया सुळे, उदयनराजे भोसले यांना अनफॉलो करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

@DevTheMaratha या ट्विटर युजरने आपली भूमिका मांडताना सांगितले आहे की, "मी एकट्याने unfollow केल्याने फरक पडत नाही तरीही....पवार साहेबांच्या भाषेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा वापर करून त्यांना unfollow करत आहे.. स्वार्थी भूमिका घेणाऱ्या किंवा 2 दगडावर पाय ठेवणाऱ्या नेत्यांना का फोल्लो करावे असा प्रश्न पडला फक्त.."

शरद पवार यांची भूमिका काय?

"लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकासंदर्भाचा विवाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून चालू आहे. हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे. लोकशाहीत अधिकार असल्याने

@girishkuber

आपली मते व्यक्त करण्याची भूमिका घेऊ शकतात. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात." अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

अनफॉलो करण्याच्या या ट्रेंडमध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनीही एक ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे, "कुबेर यांच्या पुस्तकासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते चढाओढीने प्रतिक्रिया देताहेत. अनेक महिन्यांपासून खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक लोक तक्रार करीत होते तेव्हा सरकारने झोपेचे सोंग घेतले नसते तर आजचा प्रसंग उद्भवला नसता. हल्ल्याचा निषेध !"

अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Updated : 6 Dec 2021 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top