Home > News Update > तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर World Cup खेळण्यासाठी सज्ज!

तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर World Cup खेळण्यासाठी सज्ज!

तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर World Cup खेळण्यासाठी सज्ज!
X

मुंबई : भारताच्या अंडर-19 टीमने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत आठव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. या स्पर्धेनंतर आता लगचेच अंडर-19 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या सामन्यादरम्यान भारताला राजवर्धन हंगर्गेकरच्या रुपाने एक ऑलराऊंडर खेळाडू सापडला आहे. तुळजापूरच्या या खेळाडूने आशिया कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. राजवर्धनने 3 इनिंगमध्ये 48.5 ची सरासरी आणि 194 च्या स्ट्राईक रेटने 97 रन केलेत. याशिवाय त्याने 5 इनिंगमध्ये 4.6 चा इकोनॉमी रेट आणि 26.14 च्या सरासरीने 8 विकेट घेतल्या.

दरम्यान, अंडर-19 वर्ल्ड कपला 14 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यामध्येही तो अशीच कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्राच्या तुळजापूरचा असलेल्या राजवर्धनचा प्रवास अतिशय संघर्षमय आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात राजवर्धनच्या वडीलांचे कोरोनाने निधन झालं. 'माझ्या वडिलांनी कायमच मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मला भारताकडून खेळताना बघणं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्याशिवाय जगणं खूपच कठीण आहे, मात्र आता ते आपल्यात नाहीत, हे मी मान्य केलंय. त्यामुळे मला खेळावर लक्ष केंद्रीत करायला मदत झाली,' असं राजवर्धनने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. युएईला अंडर-19 आशिया कपला जाण्याआधी राजवर्धन बँगलोरच्या एनसीएमध्ये ट्रेनिंगसाठी आला होता.

वडिलांच्या निधनानंतर राजवर्धन नैराश्येत गेला होता, मात्र, मटापूरकर आणि मित्रांनी समजवल्यानंतर राजवर्धनने पुन्हा ट्रेनिंगला सुरुवात केली. ट्रेनिंग सुरू करताना सगळ्यात मोठा अडथळा लॉकडाऊनचा होता, त्याने गेल्यानंतर स्वत: खेळपट्टी बनवली. शेतात तयार केलेल्या खेळपट्टीवर बॉलिंगचा सराव करणं कठीण होतं, पण प्रशिक्षकांच्या मदतीने राजवर्धनने सराव सुरूच ठेवला.

हंगर्गेकरने अंडर-19 विनू मंकड ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 19 विकेट घेतल्या, याशिवाय त्याने 216 रनही केले. याशिवाय इंडिया-सी कडून खेळताना त्याने अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफीमध्ये त्याने 4 आणि अंडर-19 ट्रॅन्ग्युलर सीरिजमध्ये 3 विकेट मिळवल्या.

Updated : 1 Jan 2022 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top