Home > News Update > तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 17 वर्षात 16 वी बदली

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 17 वर्षात 16 वी बदली

तुकाराम मुंढे यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाते. मात्र याच तुकाराम मुंढे यांची 17 वर्षात 16 वेळा बदली झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 17 वर्षात 16 वी बदली
X

राज्यात सर्वाधिक वेळा बदली झालेले अधिकारी कोणते? असा प्रश्न विचारला तर सहज तुकाराम मुंढे यांचे नाव ओठावर येते. कारण नोकरीच्या 17 वर्षांमध्ये तुकाराम मुंढे यांनी तब्बल 16 वेळा बदली झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपुर्वी तुकाराम मुंढे यांच्याकडे आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला होता. मात्र अवघ्या 59 दिवसात तुकाराम मुंढे यांची कुटूंब कल्याण विभागातूनही बदली झाल्याचे समोर आले आहे.

तुकाराम मुंढे यांनी यापुर्वी नांदेडमध्ये विक्रीकर आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, PMPMLA चे अध्यक्षपद अशा वेगवेगळ्या पदांवर तुकाराम मुंढे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रत्येक ठिकाणी तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावली होती. त्याबरोबरच शिस्त असलेले अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांना राजकारण्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. यातूनच तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली झाल्याचे म्हटले जाते.

तुकाराम मुंढे यांनी कुटूंब कल्याण विभागात दोन महिन्यांपुर्वी पदभार स्वीकारला होता. यानंतर अधिकाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून रात्री-बेरात्री आरोग्य केंद्रांना भेटी देऊन अनेक अधिकाऱ्यांचे बिंग फोडण्याचे काम तुकाराम मुंढे यांनी हाती घेतले होते. यामागे रुग्णांना 24 तास आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, अशी भूमिका या निर्णयामागे होती. मात्र तुकाराम मुंढे यांचा निर्णय अनेक अधिकाऱ्यांच्या पदरी पडला नाही. त्यामुळेच तुकाराम मुंढे यांची कोणत्याही क्षणी बदली होऊ शकते, असं मत व्यक्त केलं जात होतं. त्यातच आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र तुकाराम मुंढे कोणत्याही अधिकारी आणि मंत्र्याची तमा न बाळगता कायदा आणि नियमावर बोट ठेवतात. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

तुकाराम मुंढे यांची बदली ही कोणत्याही राजकीय कारणांमुळे झाली नाही. त्यांची बदली झाल्याची बातमी मी माध्यमांमध्ये पाहिली. त्यांनी काल गोवरसंदर्भात बैठकही घेतली होती. तुकाराम मुंढे यांच्यासह सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्या प्रशासकीय बाबींचा भाग आहेत. तुकाराम मुंढे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा तणाव नव्हता, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलं आहे.

Updated : 30 Nov 2022 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top