Home > News Update > ट्रम्प यांची एक्झिट तर बायडेन यांचा व्हाईट हाऊस प्रवेश निश्चित

ट्रम्प यांची एक्झिट तर बायडेन यांचा व्हाईट हाऊस प्रवेश निश्चित

US Democrat Joe Biden edged closer to winning the White House, Trump exit

ट्रम्प यांची एक्झिट तर बायडेन यांचा व्हाईट हाऊस प्रवेश निश्चित
X

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडेन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. शुक्रवारी मतमोजणी मध्ये आघाडी घेतल्यानंतर बायडेन यांनी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पेनसिल्व्हानियामध्ये देखील ट्रम्प यांच्यावर जवळपास 27 हजार मतांनी आघाडी घेतल्याने आता त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे .

या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत या मतमोजणीवर आपला आक्षेप असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेक माध्यमांनी त्यांची पत्रकार परिषद लाईव्ह दाखवणे बंद केले.

तर रिपब्लिकन पार्टी मधील काही नेत्यांनी ट्रम्प यांनी आपला पराभव आता मान्य करावा असे देखील ट्रम्प यांना सुनावले आहे. दरम्यान जॉर्जिया मधे डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीला कोर्टात आव्हान दिले होते पण कोर्टाने ट्रम्प यांची मागणी फेटाळून लावल्याने आता त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे,

न्यायालयीन लढाईमध्ये ही निवडणूक लांबवायची आणि आपण सत्तेत कसे राहू शकतो त्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे. पण आता ट्रम्प यांची एक्झिट निश्चित मानली जाते आहे.

Updated : 7 Nov 2020 3:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top