Home > News Update > टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक वगळता इतर चॅनेल्सची मालमत्ता ईडीकडून जप्त

टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक वगळता इतर चॅनेल्सची मालमत्ता ईडीकडून जप्त

टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक वगळता इतर चॅनेल्सची मालमत्ता ईडीकडून जप्त
X

मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु असलेल्या टीआरपी घोटाळ्यामध्ये नाव आलेल्या टीव्ही चॅनेल्सला ईडीने आता कारवाईचे अस्त्र उगारले आहे. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महा मूव्ही चॅनेल्सची ३२ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. विशेष म्हणजे यामधे अर्नब गोस्वामीच्या रिपब्लिक टिव्हीचा समावेश नाही. कारवाईत मुंबई, इंदूर, दिल्ली आणि देशातील इतर शहरातील स्थावर मालमत्ता आणि बँक खात्यातील रकमा जप्त केल्या असून या घोटाळ्याची व्याप्ती ४६ कोटींपर्यंत आहे.

'ईडी'ने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जमिनी, व्यावसायिक जागा तसेच निवासी संकुलांचा समावेश आहे. यापैकी व्यावसायिक जागा मुंबई आणि दिल्लीतील आहेत. तर जमिनी या गुरुग्राम आणि इंदूर येथील आहेत. मुंबईतील निवासी संकुलांचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, याच घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीविरुद्धदेखील तपास सुरू आहे. पण 'ईडी'ने केलेल्या कारवाईत रिपब्लिक टीव्हीचा उल्लेख नाही.

गेल्या वर्षी बनावटरित्या वाहिन्यांचा टीआरपी वाढवून त्याच्याआधारे जाहिराती मिळवण्याचा घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणाचा तपास ईडी देखील करत आहे. ईडीने कारवाई अंतर्गत 'फक्त मराठी', 'बॉक्स सिनेमा' व 'महा मुव्ही' या वाहिन्यांच्या मुंबई, इंदूर, दिल्ली व गुरुग्राम येथील मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Updated : 18 March 2021 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top