Home > News Update > कार्पोरेट क्षेत्रातून सावित्रीबाई फुलेंना डक्सलेजीस करणार अभिवादन

कार्पोरेट क्षेत्रातून सावित्रीबाई फुलेंना डक्सलेजीस करणार अभिवादन

कार्पोरेट क्षेत्रातून सावित्रीबाई फुलेंना डक्सलेजीस करणार  अभिवादन
X

महान समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी डक्सलेजीस या विधी सल्लागार संस्थेने खारघर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बौद्धिक संपदा क्षेत्रात कार्यरत डक्सलेजीस संस्थेने सावित्रीबाई फुलेंच्या विचारांना प्रेरणा मानून देशात ज्ञानाच्या माध्यमातून खरी बौद्धिक संपदा निर्माण करणा-या सावित्रीबाईंना अभिवादन करण्याचे ठरविले आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी रोजी जगभरात साजरा केला जातो.त्यानिमित्त खारघर येथील कामधेनू कामर्झ या व्यावसायिक संकुलात मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता एका कार्यक्रमात सावित्रीबाईंची जयंती साजरी केली जाईल. या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डक्सलेजीसचे प्रमुख दिव्येंदू वर्मा यांनी केले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बौद्धिक संपदा क्षेत्रात महिलांचे योगदान या विषयावर जगभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भारतात हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी डक्सलेजीस संस्थेवर सोपविण्यात आली होती. त्यावेळी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करूनच या कार्यक्रमाची सुरूवाती झाली होती. हा कार्यक्रम जगातील विविध देशातील बौद्धिक संपदा क्षेत्रात कार्यरत संस्थांनी लाईव्ह पाहिला होता.

Updated : 2 Jan 2023 3:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top