News Update
Home > News Update > हुतात्म्यांना जिवंत ठेवणारे क्रांती स्मृतीवन

हुतात्म्यांना जिवंत ठेवणारे क्रांती स्मृतीवन

हुतात्म्यांना जिवंत ठेवणारे क्रांती स्मृतीवन
X

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. याच क्रांतिकारकांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचं काम सांगली जिल्ह्यातील बलवडी या गावात करण्यात आलंय. या ठिकाणी क्रांतिकारकांच्या नावाने वृक्ष लाऊन ते वृक्ष जोपासले आहेत. यातून क्रांतिस्मृती वन उभे राहिले आहे.

क्रांतिकारकांची फौज शिस्तीने उभी राहिल्याप्रमाणे ही झाडे धगधगत्या इतिहासाच्या स्मृती जागवत आकाशात झेपावत आहेत. झाडांची निर्माण झालेली ही फौज प्राणी पक्षांचे आश्रयस्थान बनली आहे.

सुभाषचंद्र बोस यांना महाराष्ट्रातील गुहा बोगदे आवडायचे, याची स्मृती म्हणून प्रवेशद्वारापासून वेलींची गुहा बनवण्यात आली आहे. क्रांतीस्मृती वनातील वृक्ष रुपातील क्रांतिकारक आता स्वतःचा इतिहास सांगणार आहेत. वृक्षावर लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर आपल्या मोबाईल डिवाईसमध्ये त्या क्रांतिकारकाचा इतिहास ऐकायला मिळणार आहे. यावर सध्या येथे काम सुरू आहे.

असे म्हटले जाते की, शहिदांच्या रक्तावर क्रांतीच्या रोपट्याची वाढ होते. याच शहिदांच्या नावाने लावलेल्या रोपट्याची वाढ होऊन त्याचे वन निर्माण झाले आहे. हे क्रांतिस्मृती वन क्रांतिकारकांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल यात शंका नाही.

Updated : 2021-08-15T06:50:32+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top