Home > News Update > 'बेशिस्तपणा खपवून घेणार नाही' ; परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा

'बेशिस्तपणा खपवून घेणार नाही' ; परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा

बेशिस्तपणा खपवून घेणार नाही ; परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा
X

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. ज्यात महागाई भत्ता, घरभाडेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. वेतनावाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार आहे असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मागील काही दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे, त्याला राजकीय पक्षाने साथ दिली आहे. कर्मचाऱ्यांचे ८६ ते ८७ टक्के कामकाज सुरू २८ डेपो बंद आहेत, मात्र, काही राजकीय पक्ष कर्मचाऱ्यांच्या भावना भडकवण्याच्या प्रयत्न करत आहेत कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका,आत्महत्या नका करू असं परब यांनी म्हटले आहे.

सोबतच कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, दिवाळी आहे. कर्मचारी कामावर येवू इच्छित आहे, पण काहीजण त्यांना अडवत आहेत. दिवाळी असल्यानं कारवाई करणार नाही. मात्र, दिवाळीनंतर कारवाईबाबत विचार करावा लागेल. बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असा इशारा देखील परब यांनी दिला. सोबतच दादराच्या निमित्तानं आम्ही राज्याबाहेर भगवा पहिल्यांदा फडकवला. आजचा दिवस आनंदाचा आहे, सरकार दमदारपणे काम करत असल्याचे देगूलरचा विजयावरून स्पष्ट होते असं परब म्हणाले.

Updated : 2 Nov 2021 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top