Home > News Update > ट्रेजेडी किंग दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

ट्रेजेडी किंग दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

ट्रेजेडी किंग दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड
X

ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ.जलील पारकार यांनी ही माहिती दिली. आज बुधवारी (7 जुलै) सकाळी 7.30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं पारकर यांनी सांगितलं.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा ६ जून रोजी ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. या काळात त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या. तेव्हा दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटरवरून ट्विट करत या अफवांचे खंडन केले होते. तसेच दिलीप कुमार यांना ११ जूनला डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांना गेल्या काही वर्षांपासून किडणीचा आणि न्यूमोनियाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचा ९४ वा वाढदिवस हा हॉस्पिटलमध्येच साजरा करण्यात आला होता.

दिलीप कुमार यांनी भारतीय सिनेसृष्टीला एकसो एक असे गाजलेले चित्रपट दिले आहेत. यामध्ये नया दौर, मुघल ए आझम, देवदास, राम और शाम, अंदाज, मधुमती आणि गंगा जमुना या चित्रपटांचा समावेश आहे. १९९८ ला त्यांनी किला हा शेवटचा चित्रपट केला होता.

Updated : 7 July 2021 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top